पुणे - पुणे तेथे काय उणे, असं जे म्हणतात याचा प्रत्यय नुकताच बालगंधर्व रंगमंदिरासमोर आलाय. एका अपंग कलाकाराने पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्या अंगी असलेल्या कलेला प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी चक्क रस्त्याचा उपयोग केलाय. त्यानं काढलेली ही सुबक रांगोळी ये-जा करणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.