Surprise Me!

नागपूर  व विदर्भातील गुरुवारच्या (ता. 17) महत्त्वाच्या घडामोडी

2021-04-28 381 Dailymotion

- नागपूर : क्षुल्लक कारणावरून दोन मित्रांनी एकमेकांना मारहाण केली. मात्र, एकाने दुसऱ्याला लाकडी दांड्याने आणि दगडाने ठेचून ठार केले. ही थरारक घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता बेलतरोडीत घडली.

- नागपूर : क्राईम कॅपिटल म्हणून उल्लेख केला जात असलेल्या नागपुरातील गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.

- लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर गत आठ-दहा दिवसांत बडनेरा उपनगरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे.

- चंद्रपूर : संयुक्त कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अकरा लाख रुपयांच्यावर असतानाही स्मार्ट गाव बिबीचे उपसरपंच आशीष देरकर यांनी बीपीएल आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना देय असलेल्या धान्याची उचल स्वस्त धान्य दुकानातून केली, अशी तक्रार गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली.
#SakalNews #MarathiNews #News #Nagpur #Vidarbha #Yavatmal #Amravati #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli