Surprise Me!

नाशिकचे(Nashik) गंगापूर धऱण(Gangapur Dam)80% भरले! लवकरच गोदावरीत(Godavari River) पाणी विसर्ग.

2021-07-29 656 Dailymotion

नाशिक(Nashik) : जिल्ह्याच्या इतर भागात रिमझिम पाऊस होत आहे. इगतपुरी,(Igatpuri) त्र्यंबकेश्‍वर,(Trimbakeshwar) पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाने सातत्य राखले आहे. त्यामुळे गंगापूर धरण(Gangapur Dam) पाठोपाठ भावली,(Bhawali) वालदेवी(Waldevi) धरणही तुडुंब झाले आहे. नाशिककरांना(Nashik) पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर(Gangapur) धरणातील साठाही ८० टक्क्यांपर्यंत पोचला असून, दारणामध्ये ७८ टक्के साठा झाला आहे. सद्यःस्थितीत दारणामधून तीन हजार १९६, भावलीतून २०८, वालदेवीमधून ६५, नांदूरमध्यमेश्‍वरमधून चार हजार ९७१ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.मालेगाव(Malegaon) आणि नांदगाव(Nandgaon) तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे. (व्हिडिओ - सोमनाथ कोकरे)
#Nashik #GangapurDam #NashikDam #GodavariRiver #Igatpuri #Timbakeshwar #Waldevi #Malegaon #Bhawali #