सध्या सोशल मीडियावर रील्स बनवण्याची क्रेझच आली आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते कलाकरांपर्यंत सर्वचजण विविध रील बनवत असतात. अशातच आत्ता 'आम्ही लग्नाळू' हे गाणं जरी काही वर्षांपूर्वीचे असलं तरही हे गाणं सध्या सोशल मीडियावर फारच ट्रेडिंग आहे. नुकतेच या गाण्यावर स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील कलाकार ऑफस्क्रीन मस्ती करताना दिसून येत आहेत. मालिकेतील माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने तिच्या इन्स्टाग्रामवर मालिकेतील सिद्धांत म्हणजे अभिनेता सिद्धार्थ खिरीद सोबत डान्स करतानाचा रिल शेअर केलाय. हे दोघेही या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये माऊ आणि सिद्धांत लग्नाच्या  पारंपारिक वेशात दिसत असून दोघांनीही डोक्याला मुंडावळ्या देखील लावल्याचे दिसून येते. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा डान्स व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. त्यांच्या या सुपरहिट डान्सचे नेटकऱ्यांनी कौतुक केल असून  चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
#siddharthkhirid #DivyaPugaonkar  #MulgiZaliHo  #lokmatfilmy  #marathientertainmentnews  
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा - 
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber