वर्धा : एकाचवेळी 5 हजार लोकांनी 11 वेळा हनुमान चालीसा पठन केले. वर्धेत पहिल्यांदाच या प्रकारचे आयोजन केले होते. जनतेनेही उत्तम प्रतिसाद दिला. येथील श्रीराम मंदिर देवस्थान, श्रीराम शोभायात्रा समिती व हनुमान चालीसा आयोजन समितीच्या वतीने रविवारी सकाळी श्री हनुमान चालीसा महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या महायज्ञात जवळपास 5 हजार महिला व पुरुष मंडळी लहानमुलांसह सहभागी झाले होते.