चोरी करण्याचे आणि चोरी होण्याचे अनेक विचित्र प्रकार आपण पाहिले असतील.परंतु एका क्षणात चोरीचा प्रकार पाहून तुम्ही थक्क व्हाल.गुटखा खाण्याचे व्यसन एका सेल्समनला चांगलेच भोवले आहे.सुरेंद्र मेहता चे मेव्हणे अनिल मेहता नाकात घालण्यात येणाऱ्या सोन्याच्या चमक्यांची ते विक्री करतात. सुरेंद्र हा त्यांच्याकडे सेल्समन म्हणून काम करतो. सुरेंद्र याने नेहमीसारख्या दुकानातून 9 लाख 60 हजार रूपये किमतीच्या 10 ते 12 कॅरेट सोन्याच्या चमक्या असलेली सॅक अॅक्टीव्हावर पायाजवळ ठेवून तो निघाला. मंगळवार पेठ परिसरात असलेल्या सार्वजनिक रोडवर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोन भामट्यांनी त्याला एका मुलाचा फोटो दाखविला. या मुलाला तुम्ही कुठे पाहिलं का? अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, आपल्याला या परिसराची माहिती नसल्याचे उत्तर मेहता यांनी दिले.याच दरम्यान अनिल मेहता यांचा त्याला फोन आला. फोनवर बोलता बोलता तो गुटखा थुंकण्यासाठी वाकला. हीच संधी साधून चोरट्यांनी सोन्याच्या चमक्या असलेली सॅक लांबविली. हा प्रकार लक्षात येताच सुरेंद्र याने आरडा ओरडा केला मात्र, तेव्हढ्यात हे चोरटे पसार झाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews