जगभरात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असतानाच आता एक नवं संकट उभं ठाकलंय
ते म्हणजे डेल्टाक्रॉनचं.
डेल्टा आणि ओमिक्रॉनपासून बनलेला हा नवा हायब्रीड व्हेरियंट म्हणजे ‘डेल्टाक्रॉन’
सुरुवातीला डेल्टाक्रॉनकडे प्रयोगशाळेत झालेली चूक म्हणून पाहिलं जातं होतं.,पण आता हा नवा व्हेरियंट असल्याचं लक्षात येताच शास्त्रज्ञांनी त्यावर अभ्यास सुरु केलाय, पण बहुतांश नागरिकांचं लसीकरण झाल्यानं त्यांच्यात रोगप्रतिकारशक्ती असेल अशी आशा शास्त्रज्ञांना आहे.
त्यामुळेच नव्या डेल्टाक्रॉन व्हेरियंटनं धोका उद्भवण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवलाय.
#deltacron #deltacron #omicron #deltacronvariant #omicronnewsupdates #corona