राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपद आलं आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच ते नागपुरात दाखल झाले. पक्षासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच नागपुरात स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली.
#DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #Nagpur #SanjayRaut #GulabraoPatil #EknathShinde #shivsena #HWNews