मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपाऱ्या दिल्या. ज्यांना त्यांनी सुपाऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितलं, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. नारायण राणे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा बचाव केला. नक्षलवाद्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मारायची सुपारी दिली होती. रमेश मोरे ची हत्या कुणी केली? माझी पण सुपारी दिली होती, पण मी सुदैवाने वाचलो, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
#EknathShinde #DevendraFadnavis #NarayanRane #UddhavThackeray #Shivsena #BJP #SudhirMungantiwar #Maharashtra #HWNews