Surprise Me!

"मला निवृत्ती मिळायला हवी", राज्यपालांच वक्तव्य| Bhagatsingh Koshyari| Sanjay Shirsat| Eknath Shinde

2022-08-13 5 Dailymotion

मागील काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari Statement) यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. मला निवृत्त व्हायचे आहे. मात्र, मी राज्यपालपदावर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यपालपदावर सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

अहमदनगरमधील 'स्नेहालय' संस्थेच्यावतीने युवा प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, समाज सुधारवण्याचे काम युवकांना करावं लागणार आहे. मला निवृत्ती मिळायला हवी पण तरीही मी या राज्यपालपदावर काम करतोय. खरं तर पंतप्रधान मोदींनी माझ्यापेक्षा स्नेहालय संस्थेच्या गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या व्यक्तीला राज्यपाल करायला. त्यांनी समाजासाठी खूप मोठ काम केलं असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

#BhagatsinghKoshyari #SanjayShirsat #EknathShinde #BJP #Shivsena #NitinGadkari #Maharashtra #HWNews