Surprise Me!

"मुख्यमंत्री, उद्योगमंत्री याला जबाबदार", महाराष्ट्रातील प्रकल्पावरून Aaditya Thackeray यांची टीका

2022-09-16 9 Dailymotion

शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद निष्ठा यात्रेचा झंझावात आज शुक्रवार दि.16 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत सुरू झाली आहे. रत्नागिरी शहरातील जलतरण तलावासमोरील मैदानात शिवसंवाद निष्ठा यात्रा आयोजित करण्यात आली असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापोलीचे आमदार योगेश कदम हे दोघे शिवसेनेतून शिंदे गटात गेले आहेत. त्यापाठोपाठ चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही शिवसंवाद यात्रा महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#AdityaThackeray #UdaySamant #UddhavThackeray #SharadPawar #EknathShinde #Kokan #Shivsena #Maharashtra #BJP #HWNews