Surprise Me!

'आता मुख्यमंत्रीही लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत'; अधिवेशनाच्या आधीच Devendra Fadnavis यांची घोषणा

2022-12-19 0 Dailymotion

नागपूर येथे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी आगामी अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मांडणार असल्याची माहिती दिली. तसेच या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळालादेखील आणणार असल्याचे सूतोवाच फडणवीसांनी केले.