Surprise Me!

"Chhatrapati Sambhaji Maharaj 'धर्मवीर' नाहीत,तर..." अजित पवारांच्या विधानावरून वाद | Ajit Pawar

2022-12-31 1 Dailymotion

दरम्यान, अजित पवारांनी सभागृहात छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात केलेल्या एका विधानावरून आता चांगलाच राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा पाठही शिकवला. तसेच, छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते, असं विधान अजित पवार यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, पुण्यात पतीत पावन संघटनेकडून अजित पवारांचा निषेध करण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात येत आहे.

#AjitPawar #EknathShinde #ChhatrapatiSambhajiMaharaj #NCP #MaharashtraAssembly #WinterSession #Maharashtra #Nagpur #HWNews