Surprise Me!

"धरणवीरला 'धर्मवीर' कसे समजणार..", BJP आमदाराची अजित पवारांवर जोरदार टीका| Ajit Pawar | Sharad Pawar

2022-12-31 47 Dailymotion

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केलेल्या विधानावरुन राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीराजेंना धर्मवीर नको, स्वराज्यरक्षक म्हणा असे विधान अधिवेशनादरम्यान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते आक्रमक झाले असून त्यांच्याविरुद्ध आंदोलनही करण्यात आले होते. याच मुद्द्यावर भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विट करत अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन नव्या वादाला सुरूवात झाली आहे. छत्रपती संंभाजी राजेंना धर्मवीर नव्हे स्वराज्यरक्षक म्हणा असे वक्तव्य अजित पवार यांनी नागपुर अधिवेशनात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाने जोरदार टीका केली होती. याचसंबंधी भाजपा (BJP) नेते आमदार नितेश राणे यांचे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.

#AjitPawar #SharadPawar #DevendraFadnavis #PankajaMunde #PritamMunde #ChandrashekharBawankule #Maharashtra #NCP #HWNews