Surprise Me!

Kasaba Peth Bypoll: उमेदवारी अर्ज भरण्याआधी काँग्रेस उमेदवार टिळक कुटुंबीयांच्या भेटीला

2023-02-06 0 Dailymotion

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाली असून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी रविंद्र धंगेकरांनी केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली. यावेळी शैलेश टिळक यांनी रविंद्र धंगेकरांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना धंगेकर म्हणाले की, भाजपा मतदारांना गृहीत धरून ही निवडणूक लढवित आहे. त्यामुळे पुणेकर नागरिक भाजपाला नक्कीच जागा दाखवतील, अशा शब्दांत धंगेकरांनी टीका केली आहे.