Surprise Me!

Eknath Shinde: "MPSC विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे तीच सरकारची देखील आहे"

2023-02-23 16 Dailymotion

नव्या परीक्षा पद्धतीवरून MPSC विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन पुकारलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत सकारात्मक भूमिका घेतली आहे. जी विद्यार्थ्यांची भूमिका आहे तीच सरकारची देखील असल्याचं म्हणत लवकरच यावर योग्य निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. एका कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे हे औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.