Surprise Me!

MC Stan vs MNS: '...तर कार्यक्रमस्थळी धुडगूस घालू'; रॅपर एमसी स्टॅनच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध

2023-03-18 2 Dailymotion

'बिग बॉस' विजेता एमसी स्टॅन याला नागपुरात कार्यक्रमासाठी येऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. "एमसी स्टॅन हा त्याच्या 'रॅप सॉंग' मधून अश्लील भाषा वापरतो त्यासोबतच मादक पदार्थांचे सेवन करण्याचे प्रोत्साहन देतो. त्याच्या काही गाण्यात तर गांजा सेवनाचाही उल्लेखही आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला नागपूर शहरात कुठल्याही कार्यक्रमासाठी येऊ देणार नाही. हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहन होणार नाही. त्यामुळे नागपूर शहरात अणि जिल्ह्यात एमसी स्टॅन याला येऊ देणार नाही" असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. 'या कार्यक्रमाला जर शासनाने जर परवानगी दिली तर आम्ही त्याच्या कार्यक्रम स्थळी जाऊन धुडगूस घालू' असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.