Surprise Me!

"कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावं"; संपकरी कर्मचाऱ्यांच्या समन्वयकांचं आवाहन | Mumbai

2023-03-20 0 Dailymotion

गेल्या ७ दिवसांपासून राज्यात सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सरकारशी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी जाहीर केलं आहे. यासह संप काळात ज्यांना कारवाई संदर्भात नोटीस देण्यात आल्या त्या देखील मागे घेण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं काटकर यांनी सांगितलं.