Surprise Me!

Ajit Pawar on Dada Bhuse: 'दादा भुसे तुमचे शब्द मागे घ्या, माफी मागा'; अजित पवारांची सभागृहात मागणी

2023-03-21 3 Dailymotion

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सोमवारी संध्याकाळी केलेल्या एका ट्वीटवरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊतांनी मंत्री दादा भुसेंवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करणारं एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटवर दादा भुसेंनी आज विधानसभेत निवेदन सादर केलं. मात्र, हे निवेदन सादर करताना दादा भुसेंनी केलेल्या एका उल्लेखावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावरून संतप्त प्रतिक्रिया देत थेट दादा भुसेंना सुनावलं.