Surprise Me!

Raj Thackeray: 'माहिमच्या समुद्रात दुसरं हाजी अली उभारलं जातंय'; दर्ग्याचा मुद्दा अन् ठाकरेंचा इशारा

2023-03-22 6 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून म्हणजेच मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरून त्यांची ठाकरी तोफ डागली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी यांसारख्या अनेक विषयांवर आपल्या खास शैलीत भाष्य केलं. यावेळी त्यांनी माहिमजवळील समुद्रात दर्गा यावर विधान केले. 'समुद्रात मकदुम बाबा दर्गा उभा केला आहे. माहिम पोलीस स्टेशन तिथे जवळ आहे. महापालिकेचे लोक फिरत असतात त्यांनी पाहिलं नाही. हे नवीन हाजी अली तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना, महापालिका आयुक्तांनी मी आजच सांगतो की महिन्याभरात कारवाई झाली नाही त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग काय व्हायचं ते होऊ देत' असं राज ठाकरे म्हणाले.