Surprise Me!

Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case :केज पोलिसांच्या 'या' दोन चूका भावाच्या मृत्यूस कारणीभूत

2025-04-01 0 Dailymotion

Dhananjay Deshmukh : केज पोलिसांच्या 'या' दोन चूका भावाच्या मृत्यूस कारणीभूत

काल मसाजोग येथे मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली नाही.यावर्षी ईद चा मोठ्या  प्रमाणात करण्याचा स्वर्गीय संतोष देशमुख यांचा मानस होता.काल मुस्लिम बांधवांना काल अश्रू अनावर झाले. मुस्लिम बांधवांचा मुख्य सण असून देखील त्यांच्यामध्ये सणाबद्दल उत्साह नव्हता. त्यांनी माझ्यासोबत दिवसभर वेळ घालवला.केज पोलिसांच्या हातात तपास असताना त्यांनी तो चोखपणे करण्याचा प्रयत्न केला नाही.केज पोलिसांनी कळंब च्या महिलेची  चौकशी देखील केली नाही.त्या महिलेने अनेक लोकांना अडकवलं आहे. विशेष करून पीआय साहेबांनी केलेल्या दोन चुका आमच्या भावाला मृत्यूच्या तोंडात नेण्यास कारणीभूत ठरले. होळीच्या दिवशी कर्मचारी उत्साहात होळी साजरा करत होते. याचा आता तरी तपास झाला पाहिजे. तपासाची अपेक्षा यंत्रणांकडून आम्हाला आहे. कृष्णा आंधळे बाबत मी एस पी साहेबांना फोन केला होता, तो का जेरबंद होत नाही हा प्रश्न त्यांचा आहे. सयाजी शिंदे भेटायला येणार आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत जो काही गोंधळ चालू आहे त्याबाबत आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्या भेट घेणार आहोत. आरोपी मध्ये असतानाच या गोष्टी कशा बाहेर येतात. जेल प्रशासनाकडून आम्ही मागितलेली कुठलीच माहिती आम्हाला मिळालेली नाही.बारामतीतील मराठा क्रांती मोर्चा ची समन्वयक समिती उद्या अजित पवारांना भेटणार आहे. याच बाबतीत त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी