Ajit Pawar Full Speech : जरा दम धर...जरा! क्रॅक आहेस का? दादांची फटकेबाजी, तुफान हास्यकल्लोळ
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे पाण्याचे पूजन करण्यासाठी पोहोचले. जनाई योजनेचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे बोरकरवाडी तलाव येथे सोडण्यात आले आहे.. त्या पाण्याचे पूजन अजित पवारांच्या उपस्थितीत होत आहे. पवार साहेब यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला पाण्याशिवाय काहीही होऊ शकत नाही यासाठी आम्ही जनाई शिरसाई योजना केली 91 साली पिंपरी चिंचवड ची लोकसंख्या 6 लाख होती 2041 ला ती 61 होईल योजना करणं आमचं काम आहे परंतु त्याचा मेंटेनन्स करणं हे तुमचं काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे मी इथं अधिकाऱ्यांना घेऊन आले त्याचे कारण आहे की मला काही गोष्टी कळतात तिथे मुंबईला जर कुठला अधिकारी काय म्हटला तर मला सांगता येतं की मी तिथे जाऊन आलोय तुम्ही एअर कंडिशन बसून मध्ये बसून सांगू नका आधी या भागात कुणालाच पाणी मिळत नव्हतं तुम्ही त्यावेळेस म्हणालात की आम्ही जमिनी देतो. आम्हाला पैसे नको फक्त आम्हाला पाणी द्या. परंतु आता तुम्ही पैसे मागायला लागलेला आहात. आम्ही बंद पाईप द्वारे पाईपलाईन करणार आहोत. त्याच्यामुळे खाली जमिनीच्या तीन ते फूट पाईप टाकणार आहोत. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही शेती करू शकता. ज्यावेळेस मी पहिल्यांदा कृष्णा खोरे महामंडळाचे मंत्री झालो. त्यावेळेस मी पुरंदर उपसा योजना केली आहे. तलावात पाईप घालू नका, परकुलेशन झालेलं पाणी घ्या पुरंदर योजनेचे पाणी आपल्याला 12 महिने मिळणार आहे काल 345 वी शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी होती आम्ही अभिवादन केले फुले वाड्यात जिथे सावित्रीबाई आणि महात्मा फुले राहायचे तिथे मी गेलो होतो 200 कोटी रुपये स्मारकासाठी मी मनपा ला दिले आहेत.. नवीन नोकरी मिळाल्यावर तिकडे गेले पाहिजे..मी शेती करायचो कतेवाडीत राहायचो पण खासदार झाल्यावर गेलो ना मुंबई ला. 5 वर्षाला आमदाराला मिळतात 25 कोटी. मी 100 दिवसात दीड हजार कोटी आणलेत कशाला म्हातातता. जनावरांचा डॉक्टर असलेला दवाखाना आणलेला आहे. एक जण मला सांगितलं दादा कुत्र आजारी पडलं होतं.
अजित पवार बारामतीत बोलत होते..