Aaditya Thackeray Speech : 10वीची परीक्षा तोंडावर असताना बाबांसहदौऱ्यावर गेलो, ठाकरेंचं तुफान भाषण
: विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेना शिंदे गट आणि मनसेमध्ये (MNS) मुंबईतील माहिमच्या जागेवरुन वाद झाला होता. राजपुत्र अमित ठाकरे माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते, त्यामुळे तिथे महायुतीने उमेदवार देऊ नये अशी अपेक्षा मनसेच्या नेत्यांना होती. मात्र, सदा सरवणकर यांनी येथून शिवसेना पक्षातून निवडणूक लढवली आणि दोघांत तिसरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. त्यामुळे, तेव्हापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दुरावा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, हा दुरावा आता संपुष्टात आला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंनी स्नेहभोजन केले. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे, त्यातच आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या भेटीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर पहिली प्रतिक्रिया दिली. मी त्या भेटीवर जास्त बोलणार नाही, कारण मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. यावेळी, त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली. ते एसंशी गटाचे गँगचे लीडर आहेत, आज गावी जाणार आहेत. चंद्र आज कुठल्या दिशेत आहे माहित नाही पण त्यांचं नाराजीनाट्य सुरू झालेल आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली. तसेच, नाराजी नाट्य सुरू झालं की मग गावी जाऊन प्रॅक्टिस करून येतात, असेही आदित्य यांनी म्हटले.