पहलगाम हल्ल्यात मुस्लिम तरुण जो पर्यटकांसाठी घोडा चालवण्याचं काम करत होता, त्यालाही दहशतवाद्यांनी ठार मारलं,
त्याच्या घोड्यावर जे पर्यटक होते, त्याला वाचवण्यासाठी तो प्रयत्न करत होता, दहशतवाद्यांची बंदूक खेचण्याच्या प्रयत्नात त्याला गोळी मारली..
तो घरी एकटाच कमावता होता..
तीन वाजताच्या आसपास दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कुटुंबाला समजली त्यावेळी सय्यदच्या कुटुंबाने त्याला कॉल केले, पण फोन उचलला नाही..
त्याच्या कुटुंबाने या व्हिडीओमध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.. पहलगामवर डाग लागलाय, हा डाग आता हटवणं खूप कठीण आहे , असं त्यांचं म्हणणं आहे
काल मृतदेहासमोर सुन्न होऊन बसली, आज लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!
पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात, भारतीय नौसेनेचे २६ वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला... काल बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी गोळी झाडल्यानंतर त्यांच्या मृतदेहाशेजारी, खिन्न मनाने बसलेल्या पत्नीचा फोटो व्हायरल झाला होता... त्यानंतर आज नरवाल यांचं पार्थिव आज दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं.. त्यांना नौदलातर्फे मानवंदना दिली गेली.. यावेळी पत्नी हिमांशीच्या भावना अनावर झाल्या.. आणि तिने थेट पार्थिवावर झोकून देत, मोठ्याने टाहो फोडला... तिची ही अवस्था पाहून उपस्थितांचंही मन हेलावून गेलं...पतीला शेवटची मानवंदना देताना पत्नी हिमांशी नरवालनं 'जय हिंद' अशी घोषणा दिली आणि त्याचवेळी तिथे उपस्थित सर्वांचं मन हेलावलं.