Sanjay Gaikwad On Devendra Fadnavis | पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संजय गायकवाडांची दिलगिरी
पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल संजय गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, मात्र आपल्या व्यक्तिगत अनुभवावरुन ते वक्तव्य केलं असून आपण वक्तव्यावर ठाम, संजय गायकवाड यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया
बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल पोलिसांवर टीका करताना आक्षेपार्य भाषा वापरली होती त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाला होता... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती त्यावरून एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना समज दिला . आज माध्यमांची बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे मात्र माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून नेते वक्तव्य केलं असून मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचाही ते म्हणाले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी