मुंबईने शहरी पायाभूत सुविधांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. भारताचा पहिला ‘Melody Road’ आज मुंबईच्या Coastal Road वर सुरू करण्यात आला आहे. या अनोख्या रस्त्यावरून ठराविक वेगात वाहन गेल्यास ‘Jai Ho’ या गाण्याची चाल ऐकू येते.
हा संगीतमय रस्ता नरिमन पॉईंट ते वरळी दरम्यान, Coastal Road टनेलमधून बाहेर आल्यानंतर उत्तरवाहिनी मार्गावर तयार करण्यात आला आहे. सुमारे 500 मीटर लांबीच्या या भागात विशेष ग्रूव्ह्ज (rumble strips) टाकण्यात आले असून, वाहनाचे टायर त्यावरून जाताना संगीत निर्माण होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 70 ते 80 किमी प्रतितास वेगात गाडी चालवल्यास हे संगीत स्पष्टपणे ऐकू येते.
अशाच Mumbai Infrastructure News, Civic Innovations, Maharashtra Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.
#Mumbai #MelodyRoad #CoastalRoad #JaiHo #AsianetNewsMarathi