India–France Innovation Year 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी मुंबईत संपूर्ण दिवस विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मुंबईतील लोक भवन येथे दोन्ही नेत्यांमध्ये शिष्टमंडळस्तरीय आणि द्विपक्षीय चर्चा पार पडली. या चर्चांमध्ये संरक्षण क्षेत्र, राफेल विमाने, पाणबुडी, पाचव्या पिढीच्या फायटर जेट इंजिन्स, अवकाश सहकार्य, उच्चगती रेल्वे, तंत्रज्ञान हस्तांतरण यासह अनेक विषयांवर सविस्तर संवाद झाला.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी भारत–फ्रान्स धोरणात्मक स्वायत्तता, दहशतवादाविरोधातील लढा, आणि जागतिक आव्हानांवर संयुक्त भूमिका अधोरेखित केली. पंतप्रधान मोदींनी लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य, बहुध्रुवीय जग, आणि जागतिक संस्थांतील सुधारणांवर दोन्ही देशांचे समान मत असल्याचे स्पष्ट केले.
भारत–फ्रान्स संबंध, जागतिक राजकारण आणि ब्रेकिंग अपडेट्ससाठी Asianet News Marathi ला Subscribe करा.
#PMModi #PresidentMacron #IndiaFranceRelations #AsianetNewsMarathi