राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत कथित अजित पवार यांच्या विमान दुर्घटना प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली.
रोहित पवार यांनी सांगितले की, या प्रकरणासंदर्भातील काही पुरावे आणि तपास अहवाल उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेअर करण्यात आले. तसेच VSR Plane Company आणि DGCA यांच्यावर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणात FIR का दाखल होत नाही? असा सवालही त्यांनी केला.
या प्रकरणात CBI चौकशी व्हावी, तसेच तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण संसद अधिवेशनात उपस्थित करण्याचा इशारा दिल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं.
याशिवाय, रोहित पवार लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटून या प्रकरणात चौकशीची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
अशाच Maharashtra Politics, Breaking News, Political Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.
#RohitPawar #UddhavThackeray #Matoshree #AsianetNewsMarathi #Politics